पाउस

By Krutika Save

"पाउस....
पानवरून ओघळणार सरीच पाणी, त्याने उमटलेलि थेंबांची नक्षी,
हसणारी फुलं, बागडणारी मुलं,
घराच्या छतावरून होणारी पाण्याची टप टप,
वळचणीला झालेली पक्षांची गर्दी, त्यांच्या पंखांची फडफड,
माझ्या रेन कोटची लग बग, बाटली गळ्यात अडकवून तुझ्या हाताची धरलेली घट्ट मिठी,
शाळेच्या दिशेने उचलेली पावलं, पावलातला ओलावा, छोट्याशा डबक्यात धप्पकन मारलेली उडी,
तुझा छोटासा धपाटा, पदराने पुसलेले पाय, डोळ्यात दाटलेली काळजी....

छात्रीतल दप्तर सांभाळत तुझ्या सोबत खाल्लेला मका, तुझ्या सोबत फिरताना अंगावर घेतलेलं अवघं आकाश, मुठीत साठवलेली स्वप्नं,
पाण्य्ची धार ओंजळीत धरायचा प्रयत्न, ती ओंजळीत मावणार नाही ह्याची जाणीव झाल्यावर ओठावर येणार हसू, तुझ्यापासून दूर जाताना आलेलं आंसू,
तू म्हणालीस पुन्हा भेटू म्हणून लावलेली आस, जोरात पडलेल्या धुवाधार पावसात गारांची रास....

तुझा हात धरून एकाच छत्रीत भिजत जाणं,
थोडासा पाउस, थोडीशी छत्री घेऊन उमलत जाणं, खिडकीवर साचलेलं पावसाचं पाणी,
ओघळणार्या धारा, आणि सुचलेली गाणी,
तुझ्या सोबत ऐकलेलं पावसाचं गाणं,
खिडकीवरच्या वाफेवर लिहिलेला तुझं माझं नाव,
मातीचा ओलावा, वेडा झालेला गारवा....
पाउस....हे सर्व काही, आणि अजून बरच काही....पाउस
--कृतिका"


Leave a comment