BY SUNITA LAKHOTIYA
अनाथांची माय सिंधुताई
त्यांनी दिली मायेची सावली
काट्यावर चालूनी दुःख झेलूनी
हजारो अनाथांची झाली आई
अनाथांची माय सिंधुताई
चितेवर भाजून भाकरी
तीच होती त्यांची शिदोरी
दिवस काढले स्मशानात राहूनी
आहे वेदनेची तुमची कहाणी
ऐकून डोळ्यात येते पाणी
हजारो अनाथांची झाली आई
काट्यावर चालूनी दुःख झेलूनी
अनाथांची माय सिंधुताई
स्वतःचे दुःख विसरूनी
अनाथांचा सांभाळ करूनी
प्रकाशमय केले त्यांचे जीवन
जगण्याचा अर्थ गेल्या सांगूनी
सुखा शिवाय जगावे पाहूनी
हजारो अनाथांची झाली आई
काट्यावर चालूनी दुःख झेलूनी
अनाथांची माय सिंधुताई
Very beautiful poem… Heartiest congratulations 👏🎉