By Neelam Daphale
आम्ही सावित्रीच्या लेकी
नेतृत्वाची क्षमता भरभरून आमच्यामधी
आमच्यामध्ये ना काही कमी
हरणार कधी ना आम्ही
आम्ही सावित्रीच्या लेकी
जिजाऊंचा हाथ माथ्यावरी
आम्ही नाही हो अबला नारी
संकटांशी सामना करण्यात मजा फार येई
कठोर आव्हाने हि आम्हा सहज पेलवी
आम्ही सावित्रीच्या लेकी
तान्हा दामोदर पाठी घेऊनी
लढली आमची रणरागिणी
घेऊनी तिचा आदर्श मनामधी
रणांगणेही गाजवू आम्ही.
आम्ही सावित्रीच्या लेकी
कधी ना रडणार आम्ही
कधी ना नमणार आम्ही
आम्हाला ओ कसली भीती
उंचच उंच घेऊ भरारी
कारण आम्ही सावित्रीच्या लेकी
Khup sunder