By Mohini Meshram
अवघड जातयं ना सगळं?
चला आता सोपं करूया.
तुझ्यात तू आणि माझ्यात मी
शोधून बाहेर काढूया.
सापडले कधी आठवणीत
तर चेहर्यावर हसु आणूया.
चुकांना सोडून जे चांगल घडलं
त्यासाठी आभार मानूया.
अडचणीत असताना
मदतीला आधार बनूया.
मनात संकोच न ठेवता
पुन्हा कधीतरी गंमती रंगवूया.
मनात जे असेल
ते खरे बोलूया.
डोळ्यांना बघुन
ओठांत लपलेल्या शब्दांना वाचूया .
नजरेत न पडता स्वतःच्या
स्वतःलाच वाचवूया.
पुढच्या वाटचालीस
निर्भयाने समोर जाऊया .